
कोंडप येथील शाळेत शैक्षणिक साहित्याची मदत
२६ विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोंडप शाळेत २ ऑगस्ट रोजी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लावला. यावेळी २६ गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व खाऊचे वाटप करण्यात आले. भविष्यातही फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक मदतीचे आश्वासन देण्यात आले.




